आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहक्क आयोग:बालगृहातील छळ प्रकरण, उपायुक्तांकडून चौकशी

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शासकीय बालगृह, निरीक्षण गृहात आदिवासी विद्यार्थ्यांचा छळ करण्यात आल्याची बाब समोर आली होती. रविवारच्या अंकात याबाबत दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत महिला व बालविकास विभागाच्या औरंगाबाद विभागाच्या उपायुक्त हर्षा देशमुख यांनी रविवारी बीडच्या बालगृहास भेट देत चौकशी केली. राज्य बालहक्क आयोगानेही दखल घेतली असून अहवाल मागवला आहे.

शहरातील शासकीय बालगृहात सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून काही बालकांना ९ ऑगस्ट रोजी प्रवेश दिला हाेता. मात्र, बालगृहात अधीक्षक व इतर कर्मचाऱ्यांकडून या मुलांचा छळ केल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केला. मुलांना शौचालय साफ करायला लावले. त्यांच्याकडून भांडी घासणे, फरशी पुसण्याची कामे करून घेतली. ही कामे केली नाहीत तर त्यांना उपाशी ठेवले. त्यामुळे मुले बालगृहातून पळून गेली होती. दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित केल्यानंतर औरंगाबादच्या महिला व बालविकास विभागाच्या उपायुक्त हर्षा देशमुख यांनी बालगृहातील कर्मचाऱ्यांची चौकशी करून जबाब नोंदवले.

आयुक्तांना अहवाल देणार
या प्रकरणी चौकशी करून जबाब नोंदवले. मुले बालगृहात नव्हती त्यामुळे त्यांचा व पालकांचा जबाब घेता आला नाही. मात्र, त्यांचे म्हणणे माध्यमातून समोर आले ते नोंदवले आहे. आयुक्तांना अहवाल देणार असून दोषींवर कारवाई होईल.
-हर्षा देशमुख, उपायुक्त, महिला व बालविकास विभाग

बातम्या आणखी आहेत...