आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय:चिंचोलीमाळी - सारुकवाडी सेवा सोसायटी भाजपच्या ताब्यात

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चिंचोलीमाळी - सारुकवाडी येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत श्री. संत नामदेव महाराज सहकारी पॅनलने बाजी मारली असून या पॅनलचे सर्व १३ उमेदवार विजयी झाले आहेत. तर ही सोसायटी भाजपच्या ताब्यात आली आहे. चिंचोली ( माळी ) येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे, आ. नमिता मुंदडा, जेष्ठ नेते रमेश आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपाचे जेष्ठ नेते सुनील गलांडे, सरपंच सुनील देशमुख व राम मेजर राऊत यांच्या नेतृत्वाखाली श्री. संत नामदेव महाराज सहकारी पॅनल उभा करण्यात आला होता. या पॅनलच्या सर्व उमेदवारांनी बाजी मारली असून पॅनलचे १३ उमेदवार विजयी झाले.

बातम्या आणखी आहेत...