आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनशैली स्वरूप:बदलत्या जीवनशैलीमुळे जडताहेत आजार : डॉ. भट

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वीच्या काळी भारतात असणारे जीवनशैलीचे स्वरूप आणि सध्याचे वास्तवचित्र यात खूप बदल झालेला दिसून येतो. बदललेली आहार पद्धती, जीवनशैलीचे स्वरूप , दूरदर्शनचा अपरिहार्य असलेला वापर, अतिआवश्यक ठरलेले संगणकावरचे नोकरीचे स्वरूप या सर्वांचा परिणाम म्हणून प्रत्येकाची जीवनशैली खूप बदलेली आहे. याचा परिणाम म्हणून स्थूलता, ह्रदयाशी संबंधित आजार, रक्तदाब, मधुमेह हे आजार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, असे मत पुणे येथील मधुमेहतज्ज्ञ डॉ. श्रीपाद मुकुंद भट यांनी मांडले.

राष्ट्रीय पोषण सप्ताह उद्घाटनाच्या निमित्ताने सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालयात गृहशास्त्र विभाग व महिला कक्ष यांच्या वतीने प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेत जीवनशैलीशी निगडीत ह्रदयरोग, रक्तदाब, मधुमेह आजार व त्यावर उपाय या विषयावर एकदिवसीय आभासी राष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला होता, याप्रसंगी डॉ. भट बोलत होते. डॉ. भट पुढे म्हणाले, शरीरावर आजारांचे काय परिणाम होतात. त्यासाठी वैद्यकीय सहाय्यता कशी उपयुक्त ठरते, नियमीत आरोग्य तपासणीचे महत्त्व या सर्व गोष्टींची वैद्यकीय दृष्टीकोनातून सविस्तर माहिती दिली. पॉवर पॉइंट प्रझेंटेशनचा त्यांनी आधार घेत विषय समजावून दिला.

प्रभारी प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांनी महाविद्यालयाचा चढता आलेख उपस्थितांसमोर मांडला. तसेच नॅक मूल्यांकनामध्ये महाविद्यालयाला मिळालेल्या अ ग्रेड बाबतची माहिती दिली. तसेच जीवनशैली चांगली ठेवावी व आरोग्यपूर्णता जोपासावी असा संदेश त्यांनी दिला. या प्रसंगी उपप्राचार्य व नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सतीश माऊलगे, कमवि उपप्राचार्य सय्यद एल.एन., पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर तसेच प्राध्यापक व विद्यार्थी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गृहशास्त्र विभाग प्रमुख डॉ. माया खांदाट यांनी केले, तर आभार डॉ. मंजू जाधव यांनी मानले. डॉ. नुझहत सुलताना यांनी गृहशास्त्र विभागाची ओळख करून दिली. सदर आभासी परिसंवादाची नोंदणी एकूण ९५ जणांनी केली होती. विद्यार्थ्यांसह शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...