आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरदार वल्लभभाई पटेल ‎ जयंती:गेवराईत एकता दौडला‎ नागरिकांचा प्रतिसाद‎

गेवराई‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री‎ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या‎ जयंतीनिमित्त एकता दौड‎ प्रशासनाच्या वतीने काढण्यात‎ आली. या एकता दौडला मोठा‎ प्रतिसाद मिळाला.‎ तहसील कार्यालय, नगर परिषद,‎ पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी‎ कार्यालय व गेवराई शहरातील‎ नागरिकांच्या वतीने ३१ ऑक्टोबर‎ रोजी सकाळी ७ वाजता ही एकता‎ दौडचे पार पडली. र.भ. अट्टल‎ महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरून‎ रॅलीचा शुभारंभ तहसीलदार सचिन‎ खाडे, पतंजली योग समितीचे‎ तालुका प्रभारी प्रा.राजेंद्र बरकसे,‎ गुड मॉर्निंग ग्रुपचे प्रमुख प्राचार्य‎ राजेंद्र घुंबार्डे यांनी हिरवा झेंडा‎ दाखवून सुरुवात केली.

अट्टल‎ महाविद्यालय, जालना रोड, डॉ.‎ आंबेडकर चौक, पंचायत समिती‎ रोड, शास्त्री चौक या मार्गाने एकता‎ दौड काढण्यात आली. या एकता‎ दौडमध्ये विविध क्षेत्रातील नागरिक,‎ महिला, युवा वर्ग सहभागी झाला‎ होता. शास्त्री चौकामध्ये‎ शास्त्रीजींच्या पुतळ्याजवळ राष्ट्रीय‎ एकात्मतेची शपथ जि. प. कन्या‎ प्रशालेचे शिक्षक गलधर व बापू‎ तारूकर या शिक्षकांनी उपस्थितांना‎ दिली. त्यानंतर उपस्थितांचे आभार‎ मानून एकता दौड संपन्न झाली. या‎ एकता दौडमध्ये शहरातील शेकडो‎ स्त्री पुरुष सहभागी झाले होते.‎

बातम्या आणखी आहेत...