आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार कार्ड:नागरिकांनी मतदार कार्डला आधार कार्ड जोडून घ्यावे

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत सरकार नागरिकांसाठी सोयीसुविधा, सवलती किंवा आरोग्य सुविधा व विविध विकास योजना राबवते आहे. यासाठी पाटोदा तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या मतदार कार्डला आधार कार्ड जोडून घ्यावे, असे आवाहन डोंगरकिन्ही येथील आमदार सुरेश धस यांचे समर्थक व भाजपचे जिल्हा परिषद गटप्रमुख अनिल काथवटे यांनी केले आहे.

याबाबत काथवटे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, भारत सरकारने मतदान व आधार कार्डची नोंदणी सुरु केली असून आपल्या गावातील बीएलओकडे कार्डची झेरॉक्स प्रत देऊनही नोंद करता येते किंवा मोबाईलव्दारे कार्ड जोडून घेता येते. यासाठी संबंधित गाव वाड्या वस्तीवरील बीएलओशी संपर्क साधावा. ही जोडणी देश हिताची असुन प्रत्येक नागरिकाची संपूर्ण माहिती गोपनीय राहणार आहे. तसेच देशात किती बोगस आधार किंवा मतदार कार्ड आहेत याचाही शोध घेतला जाणार आहे.तसेच विविध विकास योजनांची माहिती तात्काळ अंमलात आणता येणार आहे. तालुक्यात सर्वच ठिकाणी ही नोंदणी सुरु असून सर्वांनी मतदान व आधार कार्ड जोडुन घ्यावे, असे आवाहन काथवटे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...