आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:निवृत्त लष्कर अधिकारी मुंडे यांचा नागरी सत्कार

धारुरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर तालुक्यातील पहाडी पारगाव येथील भागवत मुंडे हे मागील तीस वर्षापासून भारतीय सैन्य दलात विविध पदावर कार्यरत होते.सेवा समाप्तीच्या वेळी ऑफिसर कमिशनर पदावरून त्यांनी सेवानिवृत्ती घेतली आहे. ा पहाडी पारगाव येथे गावकऱ्यांच्या वतीने मिरवणूक काढून त्यांचा देशसेवेबद्दल सत्कार केला गेला. धारूर तालुक्या मधून भारतीय सैन्य दलात जाऊन देशाची सेवा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

धारूर तालुक्यातीलच पहाडी पारगाव येथील भागवत मुंडे हे ऑफिसर कमिशनर पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांनी सैन्य दलात तीस वर्ष सेवा करत मातृभूमीच्या रक्षणार्थ कर्तव्य बजावले आहे.विविध पदावर त्यांनी तीस वर्षे देशसेवा केली आहे. ऑफिसर कमिशनर पदावरून सेवानिवृत्ती घेत ते आपल्या जन्मगावी पहाडी पारगाव येथे आले असता गावकऱ्यांच्या वतीने त्यांच्या भव्य अशा सत्कार सोहळ्याच आयोजन करण्यात आले होत.यावेळी गावात त्यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.यानंतर मोठ्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास माजी आमदार केशव आंधळे, धारूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सादिक इनामदार, अतुल शिनगारे, सचिन थोरात, शिवाजी मुंडे, जयदेव तिडके, हनुमंत नागरगोजे, तुकाराम मुंढे, अनंत नांदे, ईश्वर तांबडे यासह राजकीय क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित राहिले होते. या सोहळ्याचे नियोजन गावचे सरपंच वचिष्ठ मुंडे, प्रभाकर अंडील, आसाराम मुंडे, नामदेव मुंडे, अशोक पवार, तुकाराम अंडिल, जनार्दन आंडिल, विलास गवळी यांनी केले होते.

बातम्या आणखी आहेत...