आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:ढाकेफळात हाणामारी; दोघांची डोकी फुटली

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतातील पेरणीवरून दोन गटांत दगडाने व लोखंडी गजाने झालेल्या हाणामारीत दोघांचे डोके फुटल्याची घटना ढाकेफळ ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी युसूफवडगाव पोलिसात दोन्ही गटांच्या सात जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. ढाकेफळ येथील सतीश भुजंगराव थोरात (४० ) यांनी १ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता त्यांचे शेजारी शेतकरी श्रीधर शाहुराव थोरात यांना माझ्या शेतातील तीन सरी का पेरल्या, अशी विचारणा केली असता श्रीधर थोरात, शाहुराव थोरात, भगवान थोरात या तिघा बापलेकांनी शिवीगाळ करीत दगडाने डोक्यात मारून डोके फोडले. तर लोखंडी गजाने व लाथाबुक्यांनी मारहाण करीत मुकामार दिला. अशी फिर्याद सतीश थोरात यांनी दिली.

दुसऱ्या गटाचे शाहुराव भाऊराव थोरात ( ७५ ) हे शेतात पेरणी करीत असताना त्यांचे सतीश भुजंग थोरात, अशोक भुजंग थोरात, भुजंग भाऊराव थोरात, बाबासाहेब भुजंग थोरात या चौघा बापलेकांनी शिवीगाळ करीत त्यांना दगडाने पायावर व पाठीत मारहाण केली. त्यांचा मुलगा श्रीधर थोरात हा भांडण सोडवण्यास आला असता, त्याला अशोक थोरात व बाबासाहेब थोरात यांनी अडवून त्याच्या डोक्यात दगड मारून डोके फोडले. लाथाबुक्क्या व चापटांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद शाहुराव थोरात यांनी दिली. पोलिस नाईक संपत शेंडगे व डोंगरे हे तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...