आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापालकमंत्री धनंजय मुंडे व आ.संदीप क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेच्या २० हजार १८७ लाभार्थ्यांचे, जानेवारी ते मार्च २०२२ चे प्रति एक हजार रुपये प्रमाणे शहर व ग्रामीणचे मिळून सहा कोटी पाच लाख दाने हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग झाले आहेत. याकरिता आ.संदीप क्षीरसागर यांनी आईचे निधन झाले असतांनाही एवढ्या मोठ्या दु:खाच्या काळात सावरत निराधारांना आधार देण्याचे काम केले आहे असे मत संजय गांधी,श्रावणबाळ योजनेचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर, अश्फाक इनामदार यांनी केले आहे.
बीड तालुक्यात संजय गांधी योजनेचे ८ हजार ४०० लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे ११ हजार ७८४ लाभार्थी एकूण २० हजार १८४ लाभार्थ्यांचे माहे जानेवारी २०२२ ते मार्च २०२२ चे अनुदान पालकमंत्री मा.धनंजय मुंडे व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून प्रति लाभार्थी १ हजार रुपये प्रमाणे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. आपण आपले आलेले अनुदान बँक खात्यातून काढुन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय गांधी निराधार अनुदान समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर, अश्फाक इनामदार यांनी दिली आहे.
आमदारांनी समित्यांची बैठक घेण्याचे निर्देश दिले
आ.क्षीरसागरांनी दिले तहसीलदार रूजू होताच बैठकीचे निर्देश
संजय गांधी,श्रावणबाळ,इंदिरा गांधी या निराधारांसाठी संजीवनी ठरलेल्या योजनांची गेल्या अनेक महिन्यापासून बीड तहसीलसाठी कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्त नसल्याने बैठक झालेली नाही. यामुळे वारंवार याबाबत मागणी करण्यात येत होती. आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड तहसीलला नवीन तहसीलदार रुजू होताच त्यांना तत्काळ या समित्यांच्या बैठका घेण्याचे निर्देश दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.