आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्करोगाविषयी जनजागृती:कर्करोगग्रस्तांसाठी शास्त्रीय संगीत मैफल‎

बीड‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासोबतच‎ कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांकरिता‎ प्रेरणादायी उपक्रम बीडमध्ये यावर्षी प्रथमच‎ आयोजित करण्यात आला आहे.‎ रामकृष्णहरी प्रतिष्ठान तर्फे कर्करोग ग्रस्त‎ रुग्णांच्या मदतीसाठी व कर्करोग रुग्णांसाठी‎ रविवारी सायंकाळी सहा वाजता‎ यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आरंभ ही‎ शास्त्रीय संगीत मैफल घेण्यात येणार आहे,‎ अशी माहिती आरंभचे डॉ. संतोष महानोर‎ यांनी दिली.‎ कर्करोग हा शब्द जरी ऐकला, तरी काही‎ क्षणासाठी मनात भीती दाटून येते.‎ कर्करोगाचे निदान झाल्यास रुग्णाला‎ पायाखालची जमीन सरकल्यासारखी‎ वाटते. या रोगावरील उपचार खूप‎ वेदनादायी आणि खर्चिक तसेच वर्षानुवर्षे‎ चालणारे असतात.

यामुळे रुग्णांच्या‎ मानसिकतेवरही याचा परिणाम होतो. बरेच‎ रुग्ण चिंता व नैराश्याच्या गर्तेत अडकलेले‎ दिसून येतात. अशा रुग्णांना मानसिक‎ आधार देणे खुप गरजेचे आहे. यामुळे‎ संगीत, गायनाच्या माध्यमातून रुग्णांमध्ये‎ सकारात्मकता निर्माण करुन त्यांच्यामध्ये‎ कर्करोगाशी लढण्याचे बळ‎ वाढविण्यासाठी रामकृष्णहरी प्रतिष्ठान तर्फे‎ कर्करोग ग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी आज‎ रविवारी सायंकाळी सहा वाजता‎ यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आरंभ ही‎ शास्त्रीय संगीत मैफिलीचे आयोजन केले‎ आहे.‎ या मैफिलीमध्ये किराणा घराण्याचे विशाल‎ मारगुडे यांचे गायन होत आहे.

त्यांना‎ औरंगाबाद येथील प्रसिध्द हार्मोनियमवादक‎ शांतीभूषण देशपांडे व बीड येथील प्रसिध्द‎ तबला नवाज हनुमान सरवदे यांची साथ‎ लाभणार आहे. विशाल मारगुडे यांनी‎ धारवाड तसेच बेळगाव या भागामध्ये‎ अनेक मेैफिली गाजविल्या आहेत. त्यांच्या‎ सुमधुर शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय‎ गायनाचा आनंद घेण्याची सुसंधी‎ कर्करोगग्रस्त रुग्णांना तसेच बीडकरांना‎ उपलब्ध करुन देण्यात आली आहे.‎ कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे‎ असे आवाहन डॉ.संतोष महानोर यांनी केले‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...