आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने नव्या वर्षाचा संकल्प म्हणून अन्नाची नासाडी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून यानिमित्ताने स्वच्छ ताट अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. समाजातील गरजू, वंचित घटकांना अन्न मिळावे, या दृष्टीने या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या अभियाना बाबत संस्थेतल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना कल्पना देण्यात आली.
अन्न, वस्त्र, निवारारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. देशभरात एकीकडे अन्ना अभावी हजारो नागरिक उपाशी झोपत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मात्र हॉटेल वसतिगृह, मंगल कार्याल यांमधून भरमसाठ अन्न वाया जाते.असा विरोधाभास दिसून येतो. स्वच्छ ताट अभियानाची जनजागृती केल्यास हजारो टन अन्न वाचवता येते. त्यासाठी स्वच्छ ताट अभियान ही लोक चळवळ व्हावी या उद्देशाने योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांनी हे अभियान चालू करून समाजासाठी आदर्श घालून दिला आहे.
अन्नाचा एक कण तयार होण्यासाठी प्रामुख्याने १४५ दिवस लागतात. त्यासाठी शेतकऱ्यांला कठोर मेहनत घ्यावी लागते. म्हणजेच “महिने लागतात पिकवायला आणि मिनिट लागतो. अशी अवस्था देशभरात आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आवश्यक तेवढेच अन्न ताटात घ्यावे, असे आवाहन केले. हेच अन्न गरजूला दिले तर त्याची उपासमार होणार नाही. म्हणून “तेवढेच घ्या ताटात जेवढे बसते पोटात” या उक्तीप्रमाणे अन्नबचत केली तर वाया जाणाऱ्या लाखो टन अन्नाची नासाडी थांबेल व अन्नाची बचत होईल.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांनी दिली. उपक्रमाची सुरुवात फलक लावून करण्यात आली.
संस्था अध्यक्ष डॉ. सुरेश खूरसाळे, कार्यकारी कमलाकरराव चौसाळकर, उपक्रमाचे समन्वयक प्रा. मेजर एस. पी. कुलकर्णी उपस्थित होते. चौसाळकर यांनी समाजातील गरजू घटकांसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला पाहिजे, असे सांगितले तर मेजर एस.पी.कुलकर्णी यांनी समाजातील गरजू घटकांसाठी प्रत्येकाने योग्य ती मदत करायला पाहिजे, असे आवाहन केले. मानवता म्हणून प्रत्येक व्यक्तीने यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.