आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस ठाणे व परिसरातील स्वच्छता मोहीम हाती घेत अवघ्या चार दिवसांत अख्ख्या पोलिस ठाण्यात पोलिसांनी साफसफाई केली आहे. माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिसांनी पोलिस ठाणे परिसर स्वच्छता मोहीम सप्ताह राबवला. सपोनि. अण्णासाहेब खोडेवाड यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. आपण जेथे काम करतो, जेथे राहतो तो परिसर स्वच्छ असावा.
या भावनेने पोलिस ठाण्याचे सपोनि अण्णासाहेब खोडेवाड यांनी आपल्या चाळीस कर्मचाऱ्यांसह गेल्या चार दिवसांपासून पोलिस स्टेशनच्या आवारातील काटेरी बाभळी, अवास्तव वाढलेली झाडे झुडपे तोडत वृक्षारोपण करत येथील परिसर स्वच्छ व सुंदर बनवला. रात्रीची गस्त घालून जागरण झालेले पोलिस बांधव सकाळी सात वाजता सफाईच्या कामावर हजर होतात. कुदळ खोरे कुऱ्हाड झाडू हाती घेऊन दिंद्रुडच्या पोलिस स्टेशन परिसरातील केरकचरा उचलत आहेत. खोडेवाड यांच्या या उपक्रमामुळे दिंद्रुडच्या पोलीस ठाण्याचा कायापालट अवघ्या चार दिवसात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.