आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात स्वच्छता ही मोठी समस्या बनलेली आहे. अस्वच्छता ही सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या घटकांना प्रभावित करते. परिणामी राष्ट्राच्या विकासात त्यामुळे अडथळा निर्माण होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात करायला हवी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.रजनी शिखरे यांनी केले. गेवराई मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र.भ.अट्टल महाविद्यालयात आयसीएसएसआर, नवी दिल्ली व समाजशास्त्र विभाग र. भ. अट्टल महाविद्यालय, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छतेचा समाजावर होणारा परिणाम'' (स्वच्छ भारत, स्वस्थ भारत) या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या उद्घाटक म्हणून बीड येथील बलभीम महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. रजनी शिखरे उपस्थित होत्या.
याप्रसंगी बीजभाषक म्हणून संशोधक, लेखक पी.एन.ग्रॅज्युएट कॉलेज, लखनऊ येथील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विनोद चंद्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माजी समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा माजी सिनेट सदस्य प्रा.स्मिता आवचार, सरस्वती भुवन महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.संदीप चौधरी, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ, स्वच्छ भारत मिशन तथा जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद, जालना येथील भगवान तायड, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य विजय सांगळे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत पांगरीकर यांच्यासह चर्चासत्रासाठी गेवराई तालुक्यातील तब्बल शंभर ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य, महाराष्ट्रातून वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यशाळेचे प्रस्ताविक संयोजक तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रेवणनाथ काळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. समाधान इंगळे यांनी तर आभार डॉ. संदीप वंजारी यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.