आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता:अंबाजोगाई बसस्थानकात महिलांनी राबवली स्वच्छता मोहीम

अंबाजोगाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक जाणिवेचा एक भाग म्हणून कोविड विधवांसह आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांनी अंबाजोगाई बसस्थानकात रविवारी (२८ ऑगस्ट) हाती खराटा घेऊन बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.

या उपक्रमात अंबाजोगाईसह तालुक्यातील राडी, पूस, साकुड, वरवटी, सुगाव, धानोरा (बु) कुंबेफळ, सोनवळा, पोखरी, तळेगावघाट, लिंबगाव तांडा, सेलूअंबा या गावातील २५ महिला सहभागी झाल्या होत्या. आधार माणुसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते भगवंत पाळवदेंच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. आगाराच्या वतीने महिलांचे आभार मानण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...