आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता मोहीम‎:शिवसंग्रामकडून प्रभाग‎ एकमध्ये स्वच्छता मोहीम‎

बीड‎5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसंग्रामच्या वतीने शहरात‎ स्वच्छता अभियानाला सुरुवात‎ करण्यात आली असून रविवारी‎ प्रभाग क्रमांक एकमध्ये स्वच्छता‎ माेहीम राबवण्यात आली. तत्पूर्वी‎ दिवंगत विनायक मेटे यांच्या‎ समाधीस्थळाचे दर्शन घेऊन या‎ मोहिमेचा प्रारंभ झाला.‎ याप्रसंगी शिवसंग्रामचे‎ जिल्हाध्यक्ष नारायण काशीद,‎ शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस‎ अनिल घुमरे, सामाजिक न्याय‎ विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील‎ शिंदे, शहर सचिव गोपीनाथ‎ देशपांडे, कैलास शेजाळ,‎ सातिराम ढोले, वार्ड क्रमांक एकचे‎ प्रमुख हरिचंद्र ठोसर, महिला‎ आघाडी शहर उपाध्यक्षा संगीता‎ ठोसर उपस्थित होते.

या वेळी‎ प्रभागामधील पोस्टमन कॉलनी,‎ शिंदे नगर व भद्रा मारुती नगर या‎ परिसरातील नागरिक व महिला‎ सहभागी झाल्या होत्या. काशीद व‎ घुमरे यांनी प्रभागातील महिला‎ भगिनींना स्वच्छतेची महत्त्व व‎ स्वर्गीय साहेबांचा स्वच्छता‎ अभियान दृष्टिकोन समजून‎ सांगितला. नागरिकांचे प्रश्न‎ सोडण्यासाठी शिवसंग्राम सदैव‎ कटिबद्ध आहे अशी प्रतिक्रिया‎ जिल्हाध्यक्ष नारायणदादा काशीद‎ यांनी व्यक्त केली.‎

बातम्या आणखी आहेत...