आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिरूर तालुक्यातील शेतकरी पुन्हा एक वेगळ्या संकटात सापडला आहे. तालुक्यात रब्बी पिक म्हणून मोठ्या प्रमाणात हरभरा पिक घेतला जातो. मात्र हरभरा पिकावर सतत ढगाळ वातावरण अवकाळी पाउस आणि थंडी गायब होऊन बदलत चाललेल्या वातावरणाचा फटका हरभरा पिकाला बसत आहे. त्यामुळे हरभरा पिकावर मर रोग येत आहे.यामुळे हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी घट होणार असून ६६६२ हेक्टर वरील हरभरा पिक यामुळे धोक्यात आले आहे. पेरणीनंतर उगवलेले झाड जागीच पिवळे पडून मरत आहे.
दरवर्षीच्या तुलनेत मर रोगाचे प्रमाण जास्त आहे.खरीप पिक अतिपावसाने गेल्यानंतर रब्बी पिकही जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत आहे.यावर्षी मर रोगाचे प्रमाण १० ते १५ टक्के असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून दिली जात आहे. पर्यायाने उत्पादनामध्ये ४०% घट होणार असल्याची शंका विभागामार्फत वर्तवली जात आहे.त्यामुळे महागडी फवारणी करुन देखील फरक पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
हरभरा पिकात वर्षानुवर्ष सातत्याने रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट होऊ लागली आहे यामुळे तालुक्यात या वर्षी प्रथमच शेतकऱ्यांनी राजमा या पर्यायी पिकाला पसंती दिली असून ४४८हेक्टरवर राजम्याची रब्बी हंगामात पेरणी झाली आहे कमी खर्चात जास्तीचे उत्पादन राजमह्यामधून शेतकऱ्यांना मिळत आहे. रब्बी हवामानात सातत्याने होणारे बदल, व पिकावर पडणारी रोगराई, रासायनिक खताचा अतिवापर व जमिनीत असलेल्या स्फुरदची कमतरता यामुळे पिकावर मर रोगाचे प्रमाण वाढते आहे, पारंपारिक पद्धतीने वारंवार एकाच ठिकाणावर दरवर्षी हरभरा पिकाची पेरणी पद्धती यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. हरभऱ्यावर अशा प्रकारे रोगांचा प्रादूर्भाव होत आहे.
हरभरा पेरणीत घट हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये घट होत असल्याने व महागडे औषधाची फवारणी करून देखील हरभरा रोगावर नियंत्रण प्राप्त होत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी या वर्षी २९८हेक्टर क्षेत्रातील हरभरा पेरणीला बगल दिली आहे.
मंडळ निहाय पेरणी (हेक्टर मध्ये) शिरूर कासार १०१० गोमळवाडा १००३ ब्रम्हनाथ येळंब ९५२ खालापुरी ११४२ रायमोहा १ ५५७ तिंतरवणी ९९८ स्फुरदचे प्रमाण कमी झाल्याने बुरशी शेत जमिनीतील स्फुरदचे प्रमाण कमी झाल्यास जमिनीमध्ये बुरशीजन्य आजारामध्ये वाढ होत असून याचा फटका पेरणी केलेल्या पिकांना बसत असतो यामुळे शेतकऱ्यांनी महागडी औषधे फवारणी न करता स्फुरद व बुरशी यावर नियंत्रण प्राप्त करणारी कीटकनाशके फवारावीत. रवींद्र नेटके, तालुका कृषी अधिकारी शिरूर कासार
उत्पन्न कमी होणार मागील वर्षी मी दोन एकर क्षेत्रामध्ये हरभरा पेरणी केली होती यामधून मला दीड लाख रुपयाचे उत्पादन मिळाले यावर्षी मी तीन एकर क्षेत्रात हरभरा पेरलेला आहे परंतु रोगाच्या प्रादुर्भावामुळेउत्पादन कमी होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. विनायक यादव, शेतकरी आर्वी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.