आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वत्र पाणीच पाणी:मोहखेड परिसरामध्ये ढगफुटीसदृश पाऊस

दिंद्रूड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील चार दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. शनिवारी (ता. १०) धारूर तालुक्यातील परिसरासह डोंगराळ भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर डोंगराळ भागातील जोरदार पावसामुळे त्या दिशेने उत्तरेकडे वाहणारी दिंद्रुड येथील सरस्वती नदीला पूर आला. त्यामुळे या नदीवरील बंधारे व इतर छोट्यामोठ्या नद्यांवरील सर्व बंधारे तुडुंब भरून वाहताहेत.

मोहखेड परिसरातील व्हरकटवाडी, शिंगणवाडी, सुरनरवाडी आदी खेडेगाव असलेल्या डोंगराळ भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्याचा परिणाम म्हणून माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड, पिंपळगाव, बेलुरा (आ.),देवळा (खु.), उमरी (बु.) आदी गावातून वाहणाऱ्या सरस्वती नदीला पूर आला. यामुळे विहीर, बोअरच्या पाणी पातळीत गतीने वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पुढे ही सरस्वती नदी मोगरा भागात गोदावरी नदीला मिळते. मागील चार दिवसांपासून दररोजच्या पडत असलेल्या रिमझिम पावसाने शेतीतील कामे ठप्प झालीत. त्यामुळे हा पाऊस शेतातील उभ्या धानाची नासाडी करतो की काय? अशी चिंता शेतकऱ्यांना सध्या सतावत आहे.

बातम्या आणखी आहेत...