आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईचा इशारा:अनधिकृत होर्डिंग्ज प्रकरणात सीओंचा थेट कारवाईचा इशारा

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख चौकांमध्ये अनधिकृतपणे लागणाऱ्या होर्डिग्जबाबत आता नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी आंदोलन केले होते.

बीड शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज चौक तसेच मुख्य चौक,बाजारपेठ,मुख्य रस्त्यावर ठिक-ठिकाणी जाहिरातींचे बॅनर,नेत्याच्या;कार्यकर्त्याच्या वाढदिवस, पदाधिकारी निवड आदी व इतर व्यावसायिक जाहिरातीमुळे वाहतुकीची कोंडी होऊन रहदारीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचे प्रमाण वाढले होते. याविषयी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेश कर यांच्या नेतृत्वाखाली “भाई का बड्डे “ तसेच धरणे आंदोलन करण्यात आली होते.

श्वानाचा वाढदिवस साजरा करुन हे अनोखे आंदोलन करण्यात आले होते. अनधिकृत होर्डिंग्ज प्रकरणात ७ महिन्यात ३ वेळा निवेदन आणि २ वेळा आंदोलनानंतर मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी अनधिकृत होर्डिंग्ज धारकांवर कारवाई करण्याचा इशारा देत बॅनर लावल्यास थेट कारवाई करण्यात येईल असे आदेश जारी केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...