आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:लस घेतलेल्या 31 जणांना थंडी, ताप, चक्कर; तज्ज्ञ डॉक्टर म्हणतात, घाबरण्याची गरज नाही

बीड/वैजापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड : लसीकरणानंतर त्रास झालेल्यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस करताना सीएस डाॅ. गीते, लसीकरण प्रमुख डाॅ. कदम आदी - Divya Marathi
बीड : लसीकरणानंतर त्रास झालेल्यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस करताना सीएस डाॅ. गीते, लसीकरण प्रमुख डाॅ. कदम आदी
  • किरकोळ त्रास, तरी बीडमध्ये 18 तर औरंगाबादेतील 13 कर्मचारी निगराणीखाली

संपूर्ण देशभरात १६ जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी या मोहिमेला सर्व जिल्ह्यांतून चांगला प्रतिसाद मिळाला पण बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व सिल्लोड येथे लस घेतलेल्या एकूण ३१ जणांना ताप, थंडी, चक्कर येणे, डोकेदुखीच्या तक्रारी करण्यात आल्या. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, लसीकरणानंतर असा किरकोळ त्रास होणे गंभीर बाब नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

बीडमध्ये पहिल्याच दिवशी ४५१ जणांना सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोविशील्ड लस दिली गेली. दरम्यान, लसीकरणानंतरच्या २४ तासांत बीड जिल्हा रुग्णालयात १५, गेवराई तालुक्यातील एक आणि आष्टी तालुक्यातील दोन आरोग्य कर्मचारी अशा एकूण १८ आरोग्य कर्मचाऱ्यांना किरकोळ स्वरूपाचा त्रास जाणवला. त्यांना मध्यरात्रीनंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले होते. आशा स्वयंसेविका, परिचारिका आणि एका तालुका आरोग्य अधिकाऱ्याचा यात समावेश आहे. हलकासा ताप, थंडी, चक्कर येणे आणि डोकेदुखीच्या तक्रारी आहेत. सर्व तक्रारी किरकोळ स्वरूपाच्या असून कुणी गंभीर नाही असे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, रविवारी दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गिते, जिल्हा आराेग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, लसीकरण प्रमुख डॉ. संजय कदम यांनी स्थलांतरित रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. सर्व रुग्ण सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. कोरोना लसीकरणानंतर काही जणांना असा त्रास होऊ शकतो, ही सामान्य बाब असल्याचे डॉक्टर म्हणाले.

सर्वांची प्रकृती स्थिर
किरकोळ स्वरूपाच्या असून कुणी गंभीर नाही असे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, रविवारी दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गिते, जिल्हा आराेग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, लसीकरण प्रमुख डॉ. संजय कदम यांनी स्थलांतरित रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. सर्व रुग्ण सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. कोरोना लसीकरणानंतर काही जणांना असा त्रास होऊ शकतो, ही सामान्य बाब असल्याचे डॉक्टर म्हणाले.

सिल्लाेडमध्ये चौघांना उलटी, खाज
आैरंगाबाद जिल्ह्यात काेराेनाची लस घेतल्यानंतर शहरात कोणालाही फारसा त्रास झाला नाही. ग्रामीण भागात मात्र सिल्लोडमध्ये चार जणांना त्रास झाला. त्यामध्ये खाज येणे थंडीताप आणि उलटी असा त्रास झाला. मात्र त्यामध्ये कोणालाही भरती करण्याची गरज पडली नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली आहे. तर घाटीत ज्यांना लस दिली त्यांना कोणालाही थोडाही त्रास झाला नसल्याची माहिती अधिषठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली आहे.

वैजापूरमधील नऊ जणांना त्रास
वैजापूर शहरात लस घेतलेल्या ९ आरोग्य कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागला. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात तीन पुरुष व सहा महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मळमळ, ताप, उलटी यामुळे बेजार झालेल्या रुग्णांवर डॉ. रिजवान सय्यद यांनी प्राथमिक उपचार केले. दरम्यान, वैजापूरचे उपजिल्हा रुग्णालयमार्फत शनिवारी मौलाना आझाद विद्यालयात राबविण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. या बूथवर आरोग्य खात्यातील एकूण ३३ जणांना लस देण्यात आली. त्यापैकी नऊ जणांना त्रास होत असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन तारपे यांना फोनवरून कळवण्यात आले होते. नंतर त्यांना देखरेख कक्षात ठेवले होते. सर्वांच्या प्रकृतीविषयी आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक यांना फोनवर कळवण्यात आले असून लेखी अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. तारपे यांनी सांगितले आहे.

लसीकरणानंतर जिल्ह्यात काही जणांना त्रास झाला. त्यांना रुग्णालयात दाखल केले. हा त्रास किरकोळ स्वरुपाचा होता कुणीही गंभीर नाही. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. घाबरुन जाण्याचे कारण नाही. लसीकरणानंतर असा किरकोळ त्रास होऊ शकतो. - डॉ.सूर्यकांत गिते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.

बातम्या आणखी आहेत...