आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:‘बिंदुसरा’त आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम; कलेक्टरांनी घेतला आढावा

बीड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात पुरासारखी संकटे आल्यास त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यंत्रणा सज्ज झाली आहे. याची पाली येथील बिंदुसरा प्रकल्पात गुरुवारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या उपस्थितीत बीड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून रंगीत तालीम घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी सरावाची पाहणी केली.

सुरक्षा कठडे तयार करण्याच्या सूचना : बिंदुसरा धरणावर येणारे पावसाचे पाणी वाढल्यास सामान्य नागरिकांना त्या ठिकाणी जाण्यास मनाई करण्याच्या सूचना सरपंच व तलाठी यांना देण्यात आल्या. सुरक्षा कठडे तयार करण्यासाठी सूचना दिल्या. जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

तहसीलदार, पालिका मुख्याधिकारी उपस्थित
बीड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना या वेळी सूचना देण्यात आल्या. या वेळी तहसीलदार सुहास हजारे, मुख्याधिकारी उमेश ढाकणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बनसोड, नगर परिषद मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत धायतडक, पालीचे सरपंच दशरथ राऊत, तलाठी एस. बी. बांगर, ग्रामसेवक भाऊसाहेब मिसाळ, अग्निशमन दलाची टीम उपस्थित होती.
बिंदुसरा प्रकल्पात गुरुवारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मांच्या उपस्थितीत बीड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून रंगीत तालीम घेतली.

बातम्या आणखी आहेत...