आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आ. सोळंके दांपत्य, उद्योजक टवाणींविरुद्ध गुन्हा दाखल:भाजप कार्यकर्ते अशोक शेजूळ यांच्यावर हल्ला प्रकरण

माजलगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते अशोक शेजूळ यांना मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ६ हल्लेखोरांनी अडवून रॉडने जबर मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा अशोक शेजूळ यांच्या तक्रारीवरून राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, त्यांच्या पत्नी मंगल, उद्योजक रामेश्वर टवाणींसह ५ ते ७ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा शहर पोलिसांत दाखल झाला. दरम्यान, सोळंके दांपत्य व टवाणी यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला.

मंगळवारी भाजप कार्यकर्ते अशोक शेजूळ यांना शाहूनगर येथील मोरेश्वर विद्यालयाजवळ ६ हल्लेखोरांनी अडवून रॉडने वार केले. यात शेजूळ यांच्या डाव्या पायाला ३ ठिकाणी तर उजव्या पायाला एक ठिकाणी फ्रॅक्चर तसेच दोन्ही हातही फ्रॅक्चर झाले आहेत. डोक्यालाही जबर मार आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या सूतगिरणीमध्ये झालेल्या घोटाळ्यासंदर्भात याचिका दाखल केल्याच्या प्रकरणातून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप अशोक शेजूळ यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...