आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा“येत्या काहीं काळात सर्वत्र जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे विधानपरीषद सदस्य आ. सुरेश धस यांनी ऑन फिल्ड सक्रीय होत पाटोदा तालुक्यात मॅरेथॉन जनसंपर्क दाैरा सुरु केला आहे. या दौऱ्यामधुन धस यांच्याकडून आगामी निवडणुकांची आडाखे बांधनी सुरु झाली असल्याचे चित्र असुन नेहमीप्रमाणेच अचुक वेळेत आ. धस हे अँक्शनमोड मध्ये आल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदा पाटोदा तालुक्यात एक जिल्हा परिदष गट वाढल्याने आगामी निवडणुकामध्ये सर्वच प्रमुख पक्षांना आपली रणानिती योग्य पद्धतीने आखावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे. आ. सुरेश धस हे राजकारणातील अत्यंत मुत्सदी व तेवढेच मुरब्बी नेते म्हणुन ओळखले जातात. जिल्हा परीषदेच्या सारीपाटावर धसांच्या धसगिरीचा नेहमीच बोलबाला राहीलेला आहे.आगामी निवडणुका लक्षात घेऊन धस यांनी आपल्या जनसंपर्क दौऱ्याच्या माध्यमातुन जनसंवाद साधण्यास प्रारंभ केला आहे .प्रत्येक गावात कार्यकर्त व जनतेशी संवाद साधत जनतेच्या समस्या जाणुन घेत आहेत . त्याचप्रमाणे जुन्या - नव्या कार्यकर्यांची एकत्रित मोट बांधुन आगामी निवडणुकांची रणनीति आखली जात आहे .
पाच महीन्यांपुर्वी झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आष्टी - पाटोदा व शिरुर या तिन्हीही नगरपंचायताींवर भाजपा चा झेंडा फडकविण्याची किमया साधुन आ. सुरेश धसांनी आपल्या होमपिचवरील असलेली मजबूत पकड पुन्हा एकदा तितक्याच दमदारपणे अधोरेखित केली होती. निवडणुकीचे सुक्ष्म नियोजन योग्य रणनिती व थेट संवादाच्या बळावर धस यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले होते. या यशामुळे कार्यकत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण तयार झाले.
त्याच पार्श्वभूमीवर आता आगामी निवडणुकांसाठी धस यांनी आपली रणनिती आखण्यास सुरूवात केली असुन प्रत्येक गावात जावुन ते स्वतः संवाद साधत आहेत . आ. सुरेश धस यांनी सोमवार दि. १२ रोजी पाटोदा तालुक्यातील सौताडा, वाणेवाडी, घुलेवाडी येवलवाडी, धनगर जवळका, नफरवाडी, अनपटवाडी, पारगाव, ब्राम्हणवाडी, पाचंग्री, वैजाळा बेडकवाडी आदी गावांचा दौरा करून कार्यकते व नागरीकांशी थेट संवाद साधला.
आता समीकरणे बदलली
मागील झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या वेळी आ. सुरेश धस हे राष्ट्रवादीत होते तर भाजपाची धुरा माजी आ. भीमसेन धोंडे यांच्या खांदयावर होती . त्या वेळी जिल्हा परीपदेला धस समर्थक दोन तर पंचायत समिती निवडणुकीत एक सदस्य विजयी झाले होते तर भाजपा चे एक जिल्हा परिषद सदस्य व पाच पंचायत समिती सदस्य असे संख्याबळ होते. आता या भागातील राजकीय समीकरणे पुर्णतः बदलली असुन आता धस हे भाजपात आहेत तर बाळासाहेब आजबे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत .त्यातच आता तालुक्यात एक जिल्हा परिषद गट वाढला असल्याने आगामी निवडणुका सर्वच प्रमुख पक्ष व नेत्यांसाठी कसोटीच्या ठरणाऱ्या आहेत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.