आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभारंभ‎:गेवराईत शासकीय‎ कापूस खरेदीचा शुभारंभ‎

गेवराई‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कापूस हंगाम सन २०२२-२३ साठी‎ भारतीय कपास निगम लिमिटेड‎ (सीसीआय) मार्फत कमर्शियल‎ दराने कापूस खरेदीचा शुभारंभ‎ सीसीआय केंद्रप्रमुख हेमंत ठाकरे‎ यांच्या हस्ते झाला. माऊली कॉटन‎ गेवराई येथे गुरुवारपासून ही खरेदी‎ सुरू करण्यात आली.‎ बाजार समिती सचिव गंगाभिषण‎ शिंदे यांनी सांगितले की, यंदाच्या‎ कापूस हंगामासाठी केंद्र‎ शासनामार्फत कापूस हमीभाव‎ जाहीर झालेले आहेत. केंद्र शासनाने‎ जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा‎ जास्त दराने सध्या कापुस विक्री होत‎ आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या‎ कापसाला जास्तीत जास्त भाव‎ मिळावा या हेतूने भारतीय कपास‎ निगम लिमिटेड, भारत सरकार हे‎ कमर्शियल कापुस खरेदी मध्ये‎ उतरले आहेत. शेतकऱ्यास आठ‎ हजार चारशे प्रति क्विंटलचा भाव‎ देण्यात आला आहे.

सीसीआय हे‎ चालू बाजार भावाने कापुस खरेदी‎ करणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी‎ आपला कापुस माउली जिनिंग,‎ गेवराई येथे विक्रीस आणावा व‎ येताना आधारकार्ड सोबत आणावे,‎ असे आवाहन गेवराई बाजार समिती‎ सचिव गंगाभिषण शिंदे यांनी केले‎ आहे. या उद्घाटन प्रसंगी अर्जुन‎ दवे, उपमहाप्रबंधक, औरंगाबाद‎ यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे‎ उपस्थिती होती. तसेच बंडू मोटे,‎ अरुण भाडाईत, बाजार समितीचे‎ स्वप्निल सुरवसे, राम साळुंखे,‎ धनाडे मामा, जमील तांबोळी,‎ आशफाक तांबोळी, बापू धोत्रे‎ इत्यादी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...