आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाणिज्य वार्ता‎:मुख्यमंत्र्यांनी शुभारंभ‎ केलेल्या कामांचा प्रारंभ‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान‎ महा अभियान अंतर्गत टप्पा क्र.२‎ च्या बीड शहरातील सिमेंट रस्ते व‎ नाली बांधकाम या ७० कोटी‎ रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ‎ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‎ व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎ यांच्या हस्ते संपन्न झाला होता. त्या‎ कामांना शुक्रवारी प्रत्यक्षात सुरुवात‎ झाली.याप्रसंगी युवा नेते डॉ.योगेश‎ क्षीरसागर यांनी मुख्याधिकारी उमेश‎ ढाकणे व सहकार्‍यांसमवेत भेट‎ देवून कामाचा आढावा घेतला.‎ यावेळी डॉ. क्षीरसागर यांनी‎ कामांसंदर्भात समाधान व्यक्त केले‎ व पालिकेचे अधिकारी कर्मचारी‎ आणि गुत्तेदार यांना योग्य त्या सूचना‎ केल्या.

कामामुळे स्थानिक‎ नागरिकांनी देखील आनंद आणि‎ समाधान व्यक्त करत माजी मंत्री‎ जयदत्त क्षीरसागर, मा.नगराध्यक्ष‎ डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांचे‎ आभार मानले. डॉ. योगेश क्षीरसागर‎ यांचा सत्कार केला. यावेळी समवेत‎ नाळवंडी नाका परिसरात अमृत‎ सारडा,आसाराम गायकवाड,‎ बाळासाहेब गुंजाळ, सादेक जमा,‎ सय्यद इलियास, मुन्ना इनामदार,‎ अ‍ॅड.विकास जोगदंड, आरेफ खान‎ आदी उपस्थित होते.‎ डाॅ. याेगेश क्षीरसागर यांनी विकास कामांची पाहणी केली.‎

बातम्या आणखी आहेत...