आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाबरोबरच सृष्टीतील अनेक गोष्टीं कडून शिकायला मिळते. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने ताण-तणाव वाढत आहे.प्रत्येक कामात सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मार्गक्रमण करणे आवश्यक आहे.येणाऱ्या समस्यांचा सामना करून पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी नो कम्प्लेंट डे प्रत्येक दिवशी साजरा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ.गणेश मंझा यांनी केले.
केएसके महाविद्यालयात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. बीड येथील केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवारी आयोजित दिक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर होते. यावेळी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. गणेश मंझा यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ.दीपा क्षीरसागर, प्रभारी प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ.शिवाजी शिंदे, पदव्युत्तर संचालक डॉ.सतीश माऊलगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, नगरसेवक गणेश वाघमारे यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयातील पदवी,पदव्युत्तर व विद्यावाचस्पती प्राप्त पदवीधारक जवळपास १५० विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवीचे सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. मंझा पुढे म्हणाले की, के. एस. के.महाविद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. विद्यापीठातून प्रत्येक वर्षी एक लाख विद्यार्थी पदवी घेत आहेत. नोकऱ्यांच्या अभाव असला तरी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्याचा विकास करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद करून पदवीधारकांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
दीक्षांत समारंभाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर यांनी केले प्रमुख अतिथींचा परिचय डॉ.सोनाजी गायकवाड यांनी दिला. सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ.शिवाजी शिंदे यांनी केले व आभार उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर यांनी मानले. या दीक्षांत समारंभाचे समिती प्रमुख डॉ.अन्सार उल्ला खान यांच्यासह प्राध्यापकांनी हा समारंभ यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
जे ज्ञान प्राप्त करतील त्यांनाच संधी : क्षीरसागरउपाध्यक्ष डॉ.दीपा क्षीरसागर यावेळी म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी सातत्याने शिकत राहणे आवश्यक आहे.आजच्या काळात ज्ञान हेच भांडवल असल्याने जे ज्ञान प्राप्त करतील त्यांना त्यांच्या आयुष्यात संधी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करत महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सादर केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.