आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभक्त राहणाऱ्या पत्नीस पिकअपमध्ये पळवले:सासऱ्याची जावयाविरुद्ध गेवराई ठाण्यात तक्रार

गेवराई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कापूस वेचण्यासाठी गेलेल्या पत्नीस जावयाने बळजबरीने ओढत नेत पिकअपमध्ये बसवून नेल्याची तक्रार वडिलांनी गेवराई ठाण्यात दिली आहे.

तालुक्यातील मनुबाई जवळा येथील हरिभाऊ रखमाजी घोलप यांची मुलगी राधाबाईचा विवाह गावातील महादेव रामचंद्र ढाळे यांच्या सोबत २९ एप्रिल २००५ मध्ये झालेला असून तिला आकाश व विकास अशी दोन मुले आहेत. पती महादेव हा पत्नी राधाबाईच्या चारित्र्यावर संशय घेत तिला सतत मारहाण करत होता. दरम्यान, १० ऑगस्ट रोजी राधाबाईला घरातून हाकलून देत दोन्ही मुले स्वत:कडे ठेवली. तेव्हापासून मुलगी राधाबाई वडिलांकडे राहत आहे. राधाबाईने पतीच्या विरोधात न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे. बुधवार, २३ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता मुलगी राधाबाई व लहान मुलगी वंदना या दोघी दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या. जावई महादेव ढाळे याने येऊन शेत मालक अशोक सोनटक्के व गीता अशोक सोनटक्के यांना फोन करत राधाबाईला शेतात कामाला लावू नका, नाही तर मी तुमच्यावर पोलिसात केस करेन, अशी धमकी दिली.

बातम्या आणखी आहेत...