आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार‎:पळसखेड्यात बोगस मतदान‎ झाल्याची प्रशासनाकडे तक्रार‎

केज‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील पळसखेडा‎ येथे ग्रामपंचायतीच्या‎ निवडणुकीत जिल्हा परिषद‎ शाळेवर शिक्षकाची नोकरी‎ करणाऱ्या व्यक्तीने इतर‎ लोकांसह मतदान केंद्रावरील‎ कर्मचाऱ्यांशी संगनमत करून‎ बोगस मतदान केल्याची तक्रार‎ गावातील २० नागरिकांनी‎ तहसीलदारांकडे केली आहे.‎ केज तालुक्यातील‎ पळसखेडा येथील‎ ग्रामपंचायतीसाठी गावातील‎ बूथ क्र. ८४/१, ८४/२, ८४/३‎ या तीन मतदान केंद्रावर १८‎ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते‎ सायंकाळी ५.३० या वेळेत‎ मतदान झाले.

या मतदान‎ प्रक्रियेत गावातील ऋषिकेश‎ योगीराज चव्हाण याने इतर‎ लोकांसह मतदान केंद्रावरील‎ कर्मचार्यांशी संगनमत करून‎ मतदान केंद्र ताब्यात घेऊन‎ बोगस मतदान केले आहे. तर‎ ऋषिकेश चव्हाण हे औरंगपूर‎ ( ता. केज ) येथील जिल्हा‎ परिषद शाळेवर नोकरीस‎ असून ते बीएलओ ही आहेत.‎ त्यांची ड्युटी औरंगपूर येथे‎ असताना ही त्यांनी पळसखेडा‎ येथील मतदान केंद्र ताब्यात‎ घेऊन बोगस मतदान केले‎ असून त्यांनी मतदान प्रक्रियेत‎ हस्तक्षेप करून फौजदारी‎ स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.‎ त्यामुळे २० डिसेंबर रोजी‎ पळसखेडा गावाची होणारी‎ मतमोजणी रद्द करून फेर‎ मतदान घेण्यात यावे.

अन्यथा‎ अन्य मार्गाचा अवलंब करावा‎ लागेल असा इशारा प्रदीप‎ नानाभाऊ चव्हाण, शिवाजी‎ त्रिंबक चव्हाण, बंडू आश्रुबा‎ चव्हाण, व्यंकट रामदास‎ चव्हाण, नारायण उत्तरेश्वर‎ चव्हाण, माधव त्रिंबक‎ चव्हाण, तुकाराम पांडुरंग‎ देशमाने, कालिदास चव्हाण,‎ महादेव बबरु पांचाळ, हनुमंत‎ शंकर देशमुख, सूर्यकांत‎ अच्युतराव चव्हाण, बुब्रुवान‎ महादेव गायकवाड, उत्तम‎ नारायण चव्हाण, अच्युत‎ श्रीरंगराव चव्हाण, संतोष‎ गंगाधर सोळुंके, राहुल गंगाधर‎ सोळुंके, गणेश श्रीराम‎ चव्हाण, श्यामसुंदर शेषेराव‎ चव्हाण यांनी निवेदनाद्वारे‎ दिला आहे. यावेळी इतर‎ ग्रामस्थांचीही मोठ्या संख्येने‎ हजेरी होती.‎

बातम्या आणखी आहेत...