आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:कुंडलिकाचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा करा

धारूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

किल्लेधारूर शहराला सुरळीत व स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा म्हणून तत्कालीन राज्य सरकारने नगर परिषदेस २२ कोटींची कुंडलिका पाणी पुरवठा योजना मंजूर करुन निधी उपलब्ध करुन दिला. परंतु, दहा वर्षांपासून अद्याप योजना पूर्ण झालेली नाही. प्रशासनाने तातडीने योजना मार्गी लावावी अन्यथा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

याबाबत शिवसेना तालुकाप्रमुख नारायण कुरुंद यांनी निवेदनात म्हटले आहे, प्रत्येक वेळी गुत्तेदार आपली पोळी भाजून काम सोडून जात आहेत तर नवीन गुत्तेदार प्रत्येकवेळी कामाची वाढीव मुदत मागण्यापलीकडे काहीही होताना दिसत नाही. सध्या सुरु असलेली धनेगाव पाणी पुरवठा योजना जलवाहिनी फुटणे, मोटार जळणे, तांत्रिक बिघाड आदी कारणांनी अडचणीत आहे. त्यामुळे धारूर शहरात पंधरा ते २० दिवसाला अपुरा पाणीपुरवठा होत आहे. कुंडलिका योजनेचे काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करावा नसता शिवसेनेच्या वतीने १७ सप्टेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत उपोषण करण्यात येईल. सीओंना याबाबत निवेदन दिले. या वेळी शहर प्रमुख अजित शिनगारे, अनंत चिंचाळकर, नितीन सद्दीवाल, गणेश पवार, बालाजी शिंदे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...