आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजित:विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित;  गुणवंतांनी बलभीमची परंपरा ठेवली कायम

बीड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बलभीम महाविद्यालयाला बारावी बोर्ड परीक्षेची उज्वल अशी परंपरा असून यावर्षीही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वाटचालीत उत्तुंग असे यश मिळवले व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सानप यांनी केले. बलभीम महाविद्यालयात बारावी बोर्ड परीक्षेत सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी मंचावर उपप्राचार्य डॉ. संतोष उंदरे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. विजय गुंड, प्रबंधक पी.पी.डावकर यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना डाॅ.वसंत सानप म्हणाले की, कोविडच्या कठीण काळातही आमच्या प्राध्यापकांनी विद्यार्थी हीत लक्षात घेऊन, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑफलाईन वर्ग घेतले. विद्यार्थ्यांनी हे यश संपादन करून महाविद्यालयाची पारंपारिक विश्वसनीयता राखली. तसेच महाविद्यालयातील शिक्षकवृंद विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असतात. याप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत सानप यांच्या हस्ते सर्व शाखांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात प्रणित कदम, सारिका माने, मनिषा सौंदरमल, श्रावणी साखरे, पृथ्वीजीत कदम, सिद्धी दराडे, सार्थक मिसाळ, श्रुती बरकसे, वैष्णवी औताने, ॠतुजा रिटे, ओमकार चव्हाण, अशोक जोगदंड, ओमकार बहिरवाळ, प्रशिक जाधव आदी विद्यार्थ्यांची हजेरी होती.

बातम्या आणखी आहेत...