आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:कॉन्फिडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे‎ राष्ट्रीय महामंत्री खंडेलवालांचा सत्कार‎

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथे कॉन्फिडेशन ऑफ ऑल इंडिया‎ ट्रेडर्सचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांचा‎ सत्कार मराठवाडा अध्यक्ष संतोष सोहनी,‎ महासचिव विनोद पिंगळे, कोषाध्यक्ष प्रमोद निनाळ,‎ प्रताप खरात, गेवराई तालुकाध्यक्ष संजय बरगे,‎ प्रवीण खरात, उस्मानाबाद अध्यक्ष संजय मोदानी,‎ संजय मंत्री, हिंगोली अध्यक्ष तोष्णीवाल यांनी केला.‎ तसेच सचिन निवंगुणे अध्यक्ष महाराष्ट्र कॅट यांच्या‎ मार्गदर्शनानुसार मराठवाडा पदाधिकाऱ्यांची मीटिंग‎ पार पडली.

संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी‎ मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच आपापली जबाबदारी‎ घेऊन संघटनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील‎ व्यापारी वर्ग यांच्या समस्या सोडवून संघटनेचे‎ मजबुतीकरण करणे अतिशय गरजेचे आहे.‎ नवनवीन उपक्रम राबविण्यात येणार असून त्यात‎ आपला सहभाग अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तसेच‎ काटा वेधमापण व अन्न व औषध प्रशासन संदर्भात‎ महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या काळात घेण्यात येणार‎ आहेत, आदी घोषण्या करण्यात आल्या.‎

बातम्या आणखी आहेत...