आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रातील भाजप सरकार काँग्रेस नेतृत्वाला सरकारी यत्रणांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अशा दबावाला अथवा दहशतीला आम्ही भीक घालत नाही. राहुल गांधी हे देशाचा आवाज बनले आहेत. त्यांच्यावरील कारवाईमुळे काँग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. ही कारवाई आम्ही सहन करणार नाही, केंद्र सरकारविरोधात आमचा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी दिला.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीकडून चौकशी केली जात आहे. याविरोधात राज्यभरात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. बीडमध्येही शुक्रवारी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी केंद्र सरकार यंत्रणांचा सूडबुद्धीने वापर करत असल्याची टीका काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.
हे आंदोलन जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव आदित्य पाटील, अखिल भारतीय काँग्रेस महासचिव रवींद्र दळवी, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, फरीद देशमुख, नवनाथ थोटे, प्रवीणकुमार शेप, बाळासाहेब ठोंबरे, जेईन शेख, नारायणराव होके, भास्कर केदार, तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे, ईश्वर शिंदे, अमर पाटील, प्रा.अनिल जाधव, राहुल जाधव, रवींद्र ढोबळे, माउली आंधळे, सिद्धेश्वर रणदिवे, रमेश सानप, इद्रिस हाश्मी, अशोक देशमुख, मीनाक्षीताई पांडुळे, श्रीनिवास बेदरे यांच्यासह बीड जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.