आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाढत्या महागाईविरोधात जिल्ह्यात शुक्रवारी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला. बीडसह शिरूरमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदाेलन करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
जीवनावश्यक वस्तूंवर लावलेला जीएसटी कर, वाढती महागाई, बेरोजगारी, वाढते इंधन दर, केंद्र सरकारकडून होत असलेली सरकारी कंपन्यांची विक्री अशा विविध प्रश्नांवर जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
या वेळी प्रदेश काँग्रेस सचिव फरिद देशमुख, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष नवनाथ थोटे, तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे, शहराध्यक्ष परवेज कुरेशी, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल टेकाळे, गणेश जवकर, अविनाश डरपे, संतोष निकाळजे, गोविंद साठे, सफदर देशमुख, हनुमान घोडके, शेख बबलू भाई, खमर शेख, कृष्णा साळुंके, आमेर शेख, अमजद कुरेशी, शेख जमीर, सय्यद नसीर पदाधिकारी उपस्थित होते. शिरूरमध्ये झालेल्या आंदोलनात जिल्हा सरचिटणीस भास्कर केदार, शिरूर शहराध्यक्ष असिफ शेख, प्रा. संभाजी जाधव, ज्येष्ठ नेते बारिकराव खेंगरे, अशोक केकाण, कानिफनाथ विघ्ने, दादा तासतोडे, अशोक यादव, संतोष मुळीक, सखाराम मुळीक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.