आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटकांचे महत्त्वाचे योगदान:देशाच्या प्रगतीसाठी सर्व घटकांचे योगदान : डाॅ. मोरे

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यानंतर देशाने आजवर जी प्रगती साधलेली आहे. या प्रगतीत समाजातील सर्व घटकांचे महत्त्वाचे योगदान आहे. डाॅक्टर, इंजिनिअर, शिक्षक, समाजसुधारक, उद्योजक, शेतकरी, कामगार, मजूर अशा समाजातील सर्व स्तरातील समूहांच्या मेहनतीने देश उभा राहिला आहे, असे प्रतिपादन शहीद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डाॅ. संग्राम मोरे यांनी केले.

बीड येथील म. शि. प्र. मंडळ संचलित, बलभीम महाविद्यालय व केएसके महाविद्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने “भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्ष आणि पुढील वाटचाल” या विषयावर विशेष ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या समारंभास बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत सानप आणि सौ. के. एस. के. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर बलभीम महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डाॅ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डॉ. गणेश मोहिते, यांची प्रमुख उपस्थिती होती. डाॅ. संग्राम मोरे यांनी याप्रसंगी देशाची स्वातंत्र्योत्तर वाटचाल विशद केली. या वेळी विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...