आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर रद्द:वादग्रस्त डाॅ. बांगर यांची नेकनूरची नियुक्ती अखेर रद्द

बीड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला रुग्णाशी असभ्य वर्तन केल्याने वादात अडकलेल्या नेकनूर कुटीर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक बांगर यांची प्रतिनियुक्ती रद्द करुन पुन्हा नेकनूरमध्ये पदस्थापना दिली गेली होती. या विरोधात आंदोलन झाल्यानंतर गुरुवारी बांगर यांची नेकनूरमधील नियुक्ती रद्द करुन पुन्हा गेवराईत प्रतिनियुक्ती केली गेली आहे.

नेकनूर कुटीर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक बांगर यांनी काही महिन्यांपूर्वी एका महिला रुग्णाशी असभ्य वर्तन केले होते. या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर चौकशीही झाली होती. त्यानंतर बांगर यांना दोषी ठरवून त्यांची नेकनूर रुग्णालयातील नियुक्ती रद्द करुन गेवराई उपजिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे बांगर यांचीगेवराईतील प्रतिनियुक्ती रद्द करुन पुन्हा त्यांना नेकनूर येथील मुळ पदावर पाठवण्यात आले होते.

मात्र, यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. डॉ. बांगर यांची नेकनूरमधील नियुक्ती रद्द करावीअशी मागणी केली होती. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले होते. अखेर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीअधिकाऱ्यांच्या मान्यतेने गुरुवारी डॉ. बांगर यांची नेकनूरमधील नियुक्ती रद्द करुन पुन्हा गेवराई उपजिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ. सुरेश साबळे यांनी काढले.

बातम्या आणखी आहेत...