आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा खाटेवरून पडून झाला मृत्यू; डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे महिला दगावल्याचा आरोप

बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या ६० वर्षीय महिलेचा सोमवारी मध्यरात्री खाटावरून खाली पडून डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत्यू झाला. यात डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप करत महिलेच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयासमोर आक्रोश करत कारवाईची मागणी केली. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले असून महिलेची प्रकृती चिंताजनक होती म्हणून तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले.

बीड शहरातील संत नामदेवनगर भागातील ६० वर्षीय महिला २० नोव्हेंबरला सकाळी कोरोना संशयित म्हणून मदर वॉर्डमध्ये दाखल झाली. सुरुवातीपासूनच तिची प्रकृती चिंताजनक होती. अँटिजन तपासणीत तिचा अहवाल निगेटिव्ह आला तर आरटीपीसीआरच्या अहवालात ती कोरोना पॉझिटिव्ह आली. यावेळी नातेवाईकही सोबत होते. परंतु याच वार्डमधील डॉक्टर, परिचारिकांनी नातेवाइकांना रिपोर्ट आणण्यास पाठवले. तोपर्यंत महिला खाटावरून खाली पडली आणि तिच्या डोक्याला इजा झाल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयातील अतिदक्षता क्र. १ मध्ये दाखल केले. येथे सोमवारी रात्री १२.३० वाजता तिचा अखेर मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच महिलेच्या दोन्ही मुली, जावई, मुलाने जिल्हा रुग्णालयासमोर आक्रोश केला. डॉक्टर, कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

परिचारिकेसोबत घातला वाद

जिल्हा रुग्णालयातील मदर वॉर्डमध्ये डॉ. दिनेश राऊत यांच्यासह प्रीती प्रधान, प्रगती जाधव, अविनाश राऊत हे कर्तव्यावर होते. मृत महिला रुग्णांच्या बाजूलाच इतर रुग्णांचे नातेवाईक विनापरवानगी वाॅर्डमध्ये आले. त्यांनी परिचारिकांसोबत वाद घातला. याबाबत त्यांनी वॉर्ड प्रमुख व्ही. एस. कुलकर्णी यांच्यामार्फत मेट्रन संगीता दिंडकर यांना याची माहिती दिली आहे. आमच्या परिचारिकांनी पूर्णपणे लक्ष दिले आहे.

प्रकरणाची चौकशी सुरू

महिला दाखल झाली तेव्हापासूनच तिची प्रकृती गंभीर होती. खाटेवरून घसरून पडली होती, हे खरे आहे. कर्मचाऱ्यांनी तत्काळ उचलून तिला आयसीयूमध्ये दाखल केले. या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. -डॉ. सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser