आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड कोरोना:गेवराईत कोरोना निगेटिव्ह रुग्णाचा तर अंबाजोगाईत कोरोना संशयिताचा मृत्यू

बीडएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गेवराईतील तरुणाचा मृत्यू 'सारी'ने झाला याबाबत तपासणी करणार

जिल्ह्याचा जीव टांगणीला लावणा-या दोन घटना मंगळवारी घडल्या. गेवराई तालुक्यातील महारटाकळी येथील कोरोना संशयित इसमाचा अहवाल निगेटिव्ह आला असतानाही रात्री एकच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. तर, अंबाजोगाईत कोरोना संशयिताचा मृत्यू झाला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. गेवराईतील त्या इसमाचा मृत्यू "सारी" आजाराने झाला का याची तपासणी करण्यासाठी त्याच्या स्वॅबचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. तर दुसरीकडे अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात दोन दिवसापूर्वी दाखल करण्यात आलेल्या एका 40 वर्षीय कोरोना संशयिताचा आज मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. 

हा संशयित मुळचा ओरीसा राज्यातील आहे. एक बोअरवेलच्या गाडीवर तो मजुरी करत असे. दोन दिवसापूर्वी कोरोना सदृश्य लक्षणांमुळे त्याला स्वारातीच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास या रूग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सोमवारी त्याचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून अद्याप रिपोर्ट आलेला नाही. आज सायंकाळपर्यंत रिपोर्ट येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता की नाही हे समजू शकणार असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...