आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य अारोग्य विभागाची होत असलेली दमछाक पाहून आता केंद्राचा आरोग्य विभाग अॅक्शन मोडवर आला आहे. महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगडसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तज्ज्ञांची एकूण ५० पथके तयार केली असून यापैकी ३० पथके गुरुवारपासून महाराष्ट्रात येणार आहेत. पहिल्या लाटेला तोंड दिल्यानंतर या दुसऱ्या मोठ्या लाटेला थोपवताना राज्याच्या आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. दिवसागणीक बिकट होणारी स्थिती पाहून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तज्ज्ञांची पथके महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत पाठवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारपासून ही पथके दौरे सुरू करतील. ३ ते ५ दिवस नियोजित जिल्ह्यांमध्ये राहून स्थानिक प्रशासनासोबत पाहणी केल्यावर ही पथके रोज केंद्राला त्या िजल्ह्यातील स्थितीचा अहवाल कळवतील. शिवाय, जिल्ह्यांमध्ये योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली जात आहे का, की कुठे चुका होत आहेत हे पाहून सूचनाही देण्याचे काम पथक करेल.
व्यापारी, दुकानदार आक्रमक; ठिकठिकाणी निदर्शने
‘ब्रेक द चेन’ निर्बंधांच्या विरोधात सलग दुसऱ्या दिवशी राज्यभरात छोटे व्यापारी, दुकानदारांनी निदर्शने, आंदोलने करीत आपला विरोध दर्शवला. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे या मोठ्या शहरांसोबतच मराठवाडा, खान्देश, विदर्भातील विविध शहरांमध्ये व्यापारी रस्त्यावर उतरले होते. दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा ९ एप्रिल रोजी दुकाने उघडण्यात येतील, असा इशारा राज्यातील विविध व्यापारी, दुकानदार संघटनांनी दिला आहे. नाभिक महामंडळाने अाता १० एप्रिलपासून चार टप्प्यात राज्यभर अांदोलन छेडण्याचा इशारा दिला अाहे.
सुविधा किती भरल्या ?
80.51% आयसोलेशन बेड्स :
17.27% कोविड संशयित रुग्णांसाठी बेड्स
राज्यात काेराेनाचा पहिला पीक व सध्याच्या परिस्थितीची तुलना (रुग्ण)
राज्यात काेराेना असा वाढला
जिल्हा/ पहिला पीक ६ एप्रिलची शहर सप्टेंबर २०२० परिस्थिती
मुंबई 34259 79368
पुणे 82172 84309
नाशिक 16554 31688
औरंगाबाद 10058 17817
नागपूर 21746 57372
ठाणे 38388 61127
३ महिन्यांतील रोजचे सरासरी रुग्ण
जानेवारी 2,973
फेब्रुवारी 4,690
मार्च 21,016
महाराष्ट्रात या जिल्ह्यांत जातील पथके
पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, अहमदनगर, बुलडाणा, मुंबई शहरी भाग, नंदुरबार, सोलापूर, रायगड,लातूर, जालना, धुळे, यवतमाळ, अकोला,सातारा, वाशीम, अमरावती, परभणी, बीड, पालघर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर,सांगली व उस्मानाबाद
सूचना मिळाली, तयारी सुरू
केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक दिल्लीहून येणार असल्याची माहिती व पत्र मिळाले आहे. त्या दृष्टीने बीड आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. पाच दिवस पथक थांबून माहिती घेणार आहे. - डॉ. आर. बी. पवार, जिल्हा परिषद, बीड
सुविधा किती भरल्या?
32.77% ऑक्सिजन बेड्स
60.95% आयसीयू बेड्स
33.97% व्हेंटिलेटर्स
६०.७% रुग्ण होम क्वॉरंटाइन
३९.३% रुग्ण विविध सुविधा व रुग्णालयांत
व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करू : मुख्यमंत्री
दुकाने बंद करणे नव्हे, तर गर्दी टाळणे हा हेतू आहे. व्यापाऱ्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यापाऱ्यांना दिले. राज्यातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांनी व्हीसीद्वारे संवाद साधला. या वेळी व्यापाऱ्यांचे काम सुरू राहील आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचेही काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी उपाययोजना करण्याची मागणी व्यापारी प्रतिनिधींनी केली.
सक्रिय रुग्णवाढ
११ फेब्रुवारीपर्यंतचे 30,265
६ एप्रिलपर्यंतचे4,72,283
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.