आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​परभणी, अंबाजोगाईत उभारणार ऑक्सिजनचा प्लँट; पहिल्या टप्प्यात दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 300 जम्बो सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती शक्य

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रवीण ब्रह्मपूरकर
  • कॉपी लिंक
  • अंबाजोगाईत काम झाले सुरू, पन्नास टक्के गरज भागणार

मराठवाड्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर वेगवेगळे पर्याय शोधले जात आहेत. परळीत थर्मल पॉवर प्रोजेक्टमध्ये ओझोन प्रकल्पा संदर्भातील सामग्री अाली हाेती. मात्र हा प्रकल्प उभारण्याऐवजी अंबाजोगाई आणि परभणी येथे ऑक्सिजन प्लँट उभारण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी संबधित कंत्राटदारांना दिल्या अाहेत. त्यासाठी लागणऱ्या सर्व परवानग्या देण्यात अाल्या असून १० ते १५ दिवसांत प्लँट उभारले जातील.

याबाबत केंद्रेकर म्हणाले की, परळीला थर्मल प्रोजेक्टसाठी ओझोन प्लँट उभारणीसाठी सामग्री अाली अाहे. त्यासाठी ६ महिने लागणार आहेत. तोपर्यंत आम्ही त्याला ऑक्सिजनचा प्लँट तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कंत्राटदारदेखील बसवण्यासाठी तयार झाला आहे. अंबाजोगाई आणि परभणीत सामग्रीदेखील आली आहे. तसेच जास्तीच्या ऑक्सिजन निर्मितीसाठी कॉम्प्रेसर लागत आहेत. त्याचा देखील शोध सुरू अाहे. कॉम्प्रेसर मिळाल्यास दरराेज साधारण एका प्रकल्पातून दोन हजार जम्बो सिंलिंडर इतके ऑक्सिजन मिळणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वापर

परळी थर्मलचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड म्हणाले की, सध्या एका प्रकल्पात २ टाक्या आहेत. त्या माध्यमातून साधारण एका तासाला २० हजार लिटर ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. तेवढीच निर्मिती परभणीतदेखील होणार आहे. यामधून निर्माण होणारे ऑक्सिजन पाइपलाइनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. मात्र हे जम्बो सिलिंडरमध्ये भरता येणार नाही. त्यामुळे केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच त्याचा वापर होणार आहे. साधारण ३०० जम्बो सिलिंडर भरतील इतके एका प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मीती करता येणार अाहे.

अंबाजोगाईत काम झाले सुरू, पन्नास टक्के गरज भागणार
अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे म्हणाले की, ऑक्सिजन निर्मितीचे काम सुरू झाले आहे. त्याचे टँक उभारण्यात आले आहेत. त्यांना ५० हजार लिटर पाण्याच्या क्षमतेचा टँक उपलब्ध करून दिला आहे. तसेच, साधारण ३ हजार स्केअर फूट जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या आम्हाला साडेपाचशे ते सहाशे जम्बो सिलिंडर लागतात. त्यामुळे आमची ५० टक्के मागणी कमी होईल.
अंबाजोगाईत ऑक्सिजन प्लँटचे काम सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...