आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांगरणीचा वाद:कोरोना रुग्ण चुलत भावाच्या अंगावर थुंकला; बीड जिल्ह्यातील घटना, केज पोलिसांत गुन्हा दाखल

केज9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंगावर थुंकल्याचा प्रकार केज तालुक्यातील सारुकवाडी येथे घडला.

शेत नांगरणीवरून होम आयसोलेशनमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने तोंडाचे मास्क काढून त्याच्या चुलत भावाच्या तोंडावर व अंगावर थुंकल्याचा प्रकार केज तालुक्यातील सारुकवाडी येथे घडला. सारुकवाडी येथील सुभाष फुंदे व त्याची आई कुसूम फुंदे हे दोघे कोरोना पॉझिटिव्ह अाहेत. ते दोघे सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. गावातील श्रीराम पांडुरंग फुंदे हे व त्यांचा मुलगा दीपक श्रीराम फुंदे हे दोघे बापलेक शेतात पळाट्या काढत होते. यावेळी त्यांना सुभाष फुंदे शेताची नांगरणी करत असताना दिसला. तेव्हा चुलत भाऊ दीपकने “तू आमच्या मालकीचे शेत नांगरु नको, तुझेच शेत नांगर’, असे म्हणाला. त्यावरून सुभाषने मास्क काढून दीपक यांच्या तोंडावर व अंगावर थुंकला.

यावेळी सुभाषची आई कुसुम फुंदे, पत्नी उषा फुंदे व वडील बळीराम फुंदे यांनी श्रीराम फुंदे व दिपक फुंदे यांना काठीने मारहाण केली. या प्रकरणी श्रीराम फुंदे यांनी रविवार २ मे रोजी केज पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून बळीराम फुंदे, सुभाष फुंदे, कुसुम फुंदे, उषा फुंदे या चौघाविरुद्ध जीवघेणा साथ रोग पसरविणे, निष्काळजीपणा व साथ रोग कायद्याचे उल्लंघन करणे, मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...