आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जीवघेण्या कोरोना विषाणूने जिल्ह्यात साडेपाचशे बळी घेतल्यानंतर अखेर प्रतिक्षेचा क्षण आला.बुधवारी दुपारी अडीच वाजता औरंगाबादहून कोरोना लसीचे बाॅक्स घेऊन वाहन बीड शहरात दाखल झाले.जिल्ह्यात सहा ठिकाणी लसीकरणाला १६ जानेवारी पासून सुरुवात होणार असून जिल्ह्यासाठी १७ हजार ६४० डोस उपलब्ध झाले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाने टाळ्या वाजवून लसीचे स्वागत केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ आर बी पवार यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरूवातीला लसीकरण केले जाणार असून यासाठी १४ हजार ६०८ कर्मचा-यांची माहिती कोविन साॅफ्टवेअरमध्ये अपलोड केली गेली आहे.
या सहा ठिकाणी लसीकरण
बीड जिल्हा रुग्णालय, स्वाराती रुग्णालय अंबाजोगाई, उपजिल्हा रुग्णालय परळी, उपजिल्हा रुग्णालय केज, उपजिल्हा रुग्णालय गेवराई या सहा ठिकाणी लस दिली जाईल.
सर्व तयारी पूर्ण
लसीकरणाची सर्व तयारी पूर्ण झाली असून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.एका बुथवर १०० कर्मचा-यांचे लसीकरण होईल. काही अडचण आल्यास रुग्णावाहिका तयार ठेवल्या आहेत असे डीएचओ डाॅ पवार म्हणाले.
२६ लाख डोस साठवणूक क्षमता
जिल्ह्यातून २६ लाख ४९ हजार डोस साठवण्याची क्षमता असून यासाठी कोल्ड चेन पाॅइंट निश्चित केले गेले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.