आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:बीडच्या ‘शिवतीर्थ’ येथे सर्व समाजातील 101 जोडप्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या 101 मूर्तींचा मंत्र उच्चारत राज्याअभिषेक सोहळा

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४८ वा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व समाजातील १०१ जोडप्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या १०१ मूर्तींचा मंत्रोच्चारात राज्याअभिषेक करण्यात आला. यावेळी जिजाऊ वंदना व राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उपस्थित नागरिकांना गोड पदार्थाचे व पाण्याची सोय समितीकडून करण्यात आली होती. बीड शहरात देखील अभूतपूर्व असा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात व आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थ) येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवराज्याभिषेक समिती बीड शहर वतीने सामूहिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात कुठेही नाही असा दिमाखदार सोहळा बीड मध्ये पार पडला. गेली दोन वर्ष कोरोना च्या निर्बंधामुळे हा सोहळा झाला नव्हता. मात्र आता निर्बंध हटवले यामुळे महाराष्ट्रासह बीड शहरात देखील शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...