आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कापसाचेे घटले क्षेत्र, बाजरीला सोयाबीनपेक्षा अधिक भाव

संदिपान तोंडे | धारूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर तालुक्यात प्रामुख्याने घेतले जाणाऱ्या बाजरीच्या पिकात मागील दहा वर्षात मोठी घट झाली आहे. नगदी पिक म्हणून शेतकऱ्यांचा कापसाकडे कल वाढला आहे. कापसामुळे बाजरी पिकाचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे मागील दाेन वर्षांच्या तुलनेत बाजरीला आता कापूस, सोयाबीनच्या बरोबरीत भाव मिळू लागला आहे. या वर्षी बाजरीलाधारुरच्या मोंढ्यात सात हजाराचा भाव मिळत आहे .

धारूर तालुक्यातील जमिनीचे क्षेत्र हे बालाघाटाच्या डोंगराने व्यापलेले आहे. या डोंगर कुशीमध्ये मुरमाड स्वरूपाच्या जमिनी आहेत. ४६ हजार हेक्टर क्षेत्र हे खरिपाचे आहे. ८० टक्क्याच्या जवळपास खरिपाचे क्षेत्र हे पावसावर अवलंबून आहे. बाजरीचे पिक हे पावसावर येणारे पिक आहे. तालुक्यात पिंपरवाडा, भायजळी, मैंदवाडी, घागरवाडा, चोंडी, जहांगिरमोहा, चारहरी, सुरनखाडी, रेपेवाडी, भोगलवाडी, सोनिमोहा, मोरफळी, कोयाळ आदी गावे गावरान बाजरी साठी प्रसिद्ध होती. दहा पंधरा वर्षापूर्वी बाजरीचे क्षेत्र दहा हजार हेक्टर पेक्षा अधिक होते.

परंतु मागील काही वर्षात बाजरात बाजरीला मिळणारे दीड ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत भाव होता. मागील ३ वर्षात ३ हजारापर्यंत भाव होते. भाव कमी तसे उत्पादनात होत असलेली घट या मुळे शेतकऱ्यांचा कापसाकडे कल वाढला आहे.

कापसाचे चार ते पाच महिन्यात येणार बीटी बियाणे आल्याने शेतकऱ्यांनी कोरडवाहू क्षेत्रावरही कापसाचे पिक घेण्यास सुरुवात केली आहे. ५ ने ६ हजार हेक्टर असलेले कापसाचे क्षेत्र पंधरा वर्षात चौपट वाढले आहे. कापसा बरोबरच काही क्षेत्र सोयाबीनने घेतले आहे. या वर्षी कापूस क्षेत्र २० हजार ९१६ आहे. बाजरीचे क्षेत्र या वर्षी २ हजार ९७१ एवढे आहे. अगदी तुरळक ठिकाणीच बाजरीचे पिक दिसत आहे. क्षेत्र घटल्यामुळे बाजरीची मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजरीला सात हजाराचा भाव मिळत आहे.

उगवण क्षमता कमी
यावर्षी गावरान बाजरीची उगवण क्षमता कमी झाली होती. बाजरीचे बियाणे शेतकरी घरचेच पेरतात.बाजरी पेक्षा मागील काही काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. डोंगरपट्ट्यात कापसाचे व सोयाबीन क्षेत्र वाढले आहे. त्या प्रमाणात बाजरीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटलेही आहे.बाजरीला पक्षांचाही मोठ्या प्रमाणात त्रास असतो. - राजेंद्र राऊत , कृषी अधिकारी, धारूर

बातम्या आणखी आहेत...