आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेवराई:अल्पवयीन मुलीला विष पाजणाऱ्या काजळवाडीतील तरुणावर गुन्हा

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

“माझ्या सोबत लग्न कर’ म्हणून उसतोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीला गावातील तरुणाने विष पाजल्याची घटना तालुक्यातील काजळवाडी गावात दोन दिवसापूर्वी घडली होती. याप्रकरणी १ जून रोजी रात्री उशिरा गावातील तरुण तुकाराम लाड (२५) याच्याविरुद्ध मुलीच्या तक्रारीवरून गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गेवराई तालुक्यातील काजळवाडीत ऊसतोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीला गावातील तुकाराम लाड याने विष पाजले होते. दरम्यान, मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तरुणाच्या शोधासाठी गेवराई पोलिस ठाण्याचे तीन पोलिसांचे पथक नेमण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अर्चना भोसले करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...