आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविटभट्टीवर विटा तयार करण्यासाठी आलेल्या मजुरांनी उचल घेत ८ दिवस काम केले. त्यानंतर गावाकडे जाऊन परत येतोत असे सांगून निघून गेलेले मजूर परत आले नाहीत. फसवणूक झाल्याची तक्रार मॅनेजरने दिल्यावरून सहा मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गिरीश अनिलराव बारगळ यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, गिरीश हे त्यांचे काका सुदर्शन सदाशिव काळे यांच्या अंबाजोगाई शहरातील गोरख वीट उद्योग येथे मॅनेजर पदावर काम करतात. काळे यांनी वीट तयार करण्यासाठी चिंचोली गावठाण येथील मजूर अजय मधुकर शिंदे यांना १ लाख ६० हजार रुपये, लक्ष्मण आण्णासाहेब शेलार यांना १ लाख ७० हजार रुपये, अप्पा राव मच्छिंद्र शेलार यांना १ लाख ७० हजार रुपयांची उचल करारावर करारनामा करून साक्षीदारांच्या समक्ष दिली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.