आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:कर्जदारांचे 3 लाख रुपये घरी नेणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील संभाजी चौकातील भारत फायनान्स लिमिटेड शाखेतील कर्मचाऱ्याने चक्क कंपनीलाच ३ लाख १० हजार ३१० रुपयाला गंडा घातला आहे. ४४ कर्जदाराकडून जमा केलेली हप्त्याची रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता स्वतःच्या घरी घेवुन जाणाऱ्या फायनान्सचा कर्मचारी विश्वजित बंडू सोळंके (रा. आमला, ता. धारूर) याच्या विरूद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजलगाव शहरातील संभाजी चौकात भारत फायना फायानांसियल इन्क्युजन लिमिटेड कंपनीची शाखा असुन या शाखेतून ग्रामीण भागात काम करणाऱ्या बचत गटांना वार्षिक २२.६३ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केला जातो. या फायनान्स कंपनीने तालुक्यातील १६५ बचत गटातील पाच हजार कर्जदारांना २३ कोटी रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. वाटप केलेले कर्ज हे या शाखेतील आठ कर्मचाऱ्यामार्फत वसूल केले जात असे. दर आठवड्याच्या एका दिवशी हे कर्मचारी ग्रामीण भागातील गावागावात जाऊन बचत गटाच्या बैठका घेतात.

या बैठकीत कर्जदारांकडून कर्जाच्या हप्त्याची वसुली केली जाते. जमा केलेल्या कर्जदारांना कंपनीच्या रीतसर पावत्या, फोटोही देण्यात येते. अशा प्रकारे वसुली करणारा कर्मचारी विश्वजित बंडू सोळंके (रा. आमला, ता. धारूर) याने ग्रामीण भागातील बचत गटाच्या कर्जदारांकडून १५ जून २०२२ ते ५ जुलै २०२२ या काळात कर्जाच्या हप्त्याची वसुली करून त्यांना तात्पुरता पुरावाही दिला; परंतु ४४ कर्जदारांकडून वसूल केलेली कर्जाची रक्कम सोळंके याने कंपनीच्या खात्यात जमा केली नाही .

ती स्वत:कडे ठेवुन चक्क ३ लाख १० हजार ८८९ रुपयाचा अपहार केला आहे. ही बाब भारत फायनान्शियल कंपनीच्या शाखाधिकाऱ्याच्या निदर्शनास आली. त्यांनी ग्रामीण भागात जाऊन कर्जदाराने कर्ज भरल्याची खातरजमा केली सोळंके यांनी कंपनीला गंडा घातल्याचे सिद्ध झाले. यामुळे कंपनीचे शाखाधिकारी विशाल राउत यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

बातम्या आणखी आहेत...