आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:नियमबाह्य कर्जवाटप केल्या प्रकरणी सोनीमोहा सोसायटी संचालकांसह तीन बँक कर्मचाऱ्यांवर गुन्हा

बीड2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धारूर येथील सहाय्यक उपनिबंधक कार्यालयाकडून पाठपुरावा केला जात होता

सेवा सोसायटीवर प्रशासक नेमल्यानंतर धारूर तालुक्यातील सोनीमोहा सेवा सहकारी सोसायटीचे संचालक व जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांनी संगणमत करून नियमबाह्य कर्ज वाटप केल्याचा प्रकार उघडकीस आला असुन या प्रकरणी सर्वांवर फसवणुकीचा गुन्हा धारूर ठाण्यात दाखल झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे प्रकरण ताजे असतानाच धारूर तालुक्यातील सोनिमोहा सेवा सोसायटीवर मार्च 2019 मध्ये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासक नेमल्यामुळे सदर सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त झाले होते. असे असतांना नियमबाह्य पद्धतीने येथील सेवा सोसायटीवर प्रशासक नेमल्यानंतर सोनिमोहा सेवा सोसायटीचे सर्व संचालकांसह जिल्हा बँकेचे तीन कर्मचारी यांनी संगणमत करत शासनाची फसवणूक करत चुकीच्या पध्दतीने कर्ज वाटप केले.

त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी धारूर येथील सहाय्यक उपनिबंधक कार्यालयाकडून पाठपुरावा केला जात होता. मागील दोन महिन्यापासून या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडूनही टाळाटाळ केली जात होती. परंतु गुरूवार 6 मे 2021 सायंकाळी सदरील प्रकरणात सेवा सोसायटीच्या संचालकांसह, जिल्हा बँकेतील तीन कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली असून जिल्हा बँकेच्या कार्यपद्धती वर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...