आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिक्सर टिप्परने ओव्हरटेक:बालकास चिरडणाऱ्या टिप्परचालकावर गुन्हा

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मिक्सर टिप्परने ओव्हरटेक करताना समोरून आलेल्या दुचाकीला धडक देत दुचाकीवरील चार वर्षाच्या बालकास चिरडल्याची घटना चंदन सावरगाव (ता. केज) येथे घडली होती. पोलिसांनी टिप्परचा शोध घेतल्यानंतर टिप्पर चालकाविरुद्ध युसूफवडगाव ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

कुंबेफळ ( ता. केज ) येथील धनराज रतन पवार, त्यांची पत्नी अंजली पवार, चार वर्षाचा पुतण्या आशिष पवार हे तिघे ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.१० वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (एम. एच. ४४ ए.२९१४)अंबाजोगाईहुन गावाकडे निघाले होते. त्यांची दुचाकी केज-अंबाजोगाई रस्त्यावरील चंदन सावरगाव गावाजवळ आली असता मिक्सर टिप्परने ( एम. एच. १५ एफ. वाय. ५१५६ ) ओव्हरटेक करीत असताना समोरून आलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली यामुळे दुचाकीवर खाली पडलेल्या आशिष खंडू पवार या बालकाचा चिरडून जागीच मृत्यू झाला होता.

याचवेळी टिप्पर निघून गेल्याने धडक देणाऱ्या वाहनाचा तपास लागला नव्हता. त्यानंतर युसूफवडगाव ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. संदीप दहि फळे यांनी तपासाची चक्रे फिरवून या वाहनाचा तपास लावला. धनराज रतन पवार यांच्या फिर्यादीवरून संबधित टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...