आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजमिनीचा ताबा घेण्यावरून केज तालुक्यातील मांगवडगाव येथे बाप आणि दोन लेकांच्या खून प्रकरणातील १३ आरोपींपैकी ५ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचे दुसरे सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी बुधवारी ठोठावली. अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात यापूर्वी कधीही ५ जणांना तिहेरी जन्मठेप देण्यात आली नसल्याची माहिती सरकारी वकील अॅड. अशोक कुलकर्णी यांनी दिली.
सचिन मोहन निंबाळकर, हनुमंत ऊर्फ पिंटू मोहन निंबाळकर, बालासाहेब बाबूराव निंबाळकर, राजाभाऊ हरिश्चंद्र निंबाळकर, जयराम तुकाराम निंबाळकर अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत. इतर ८ आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. केज तालुक्यातील मांगवडगाव येथे पारधी समाजातील पवार कुटुंबातील व्यक्तींच्या जमिनी होत्या. पवार कुटुंबामध्ये व आरोपींमध्ये जमिनीवरून जुना वाद होता.
याच वादातून सन २००६ मध्ये बाबू शंकर पवार यास मारहाण झाली होती. दरम्यान, न्यायालयात बाबू पवार यांच्या बाजूने जमिनीचा निकाल लागला होता. वाद असलेल्या शेतात मृत बाबू शंकर पवार व त्यांची मुले, सुना असे सर्वजण १३ मे २०२० रोजी सायंकाळी जीवनावश्यक वस्तूसह ट्रॅक्टरमध्ये बसून राहण्यासाठी गेले.
या वेळी आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात बाबू शंकर पवार, मुले संजय, प्रकाश यांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, राजाभाऊ काशीनाथ निंबाळकर हा आरोपी शिक्षा भोगत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत झाला. पाचही आरोपी बीड येथील कारागृहात असून त्यांना हर्सूल कारागृहात रवाना केले जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.