आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:उमरीत वीज कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणी गुन्हा

केज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्तव्यावर असलेल्या लाईनमनला एकाने धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना केज तालुक्यातील उमरी येथे शुक्रवारी (दि.२) घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

वीज वितरण कंपनीचे लाईनमन विशाल रामेश्वर गायकवाड हे शुक्रवारी केज तालुक्यातील उमरी येथे लाईट बिल वाटप करीत असताना अरुण लिंबा शिंपले (रा. उमरी) याने त्यांना शिवीगाळ करीत विशाल गायकवाड यांच्या गच्चीला धरून हातातील लाईट बिले फेकून देत सरकारी कामात अडथळा आणला. अशी तक्रार लाईनमन विशाल गायकवाड यांच्या तक्रारीवरून अरुण लिंबा शिंपले याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...