आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर संघर्ष तीव्र करण्यासाठी किसान सभेच्या वतीने परळी येथे स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिरात बुधवारी (८ जून) पीक विमा परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन शेती प्रश्नाचे अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्षपदी शिक्षक व कामगार नेते पी. एस. घाडगे असणार आहेत.
केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे पिकांच्या नुकसानीचा आधार असलेल्या पीक विमा धोरणास घरघर लागली आहे. पीक विमा योजना शेतकरी हिताची असावी यासाठी राज्य किसान सभा शेतकऱ्यांना सोबत घेऊन शासन व प्रशासन स्तरावर संघर्ष करत आहे. पीक विम्यासह शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर संघर्ष तीव्र करण्यासाठी या पीक विमा परिषदेचे आयोजन केले आहे.
अध्यक्षस्थानी अजय बुरांडे असणार आहेत, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून किसान सभेचे राज्य सचिव अजित नवले उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून शिक्षक व कामगार नेते पी. एस. घाडगे यांची निवड केली. या समितीवर किसान सभेचे पांडुरंग राठोड, सिटूचे जिल्हाध्यक्ष बी. जी. खाडे, प्रभाकर नागरगोजे, गंगाधर पोटभरे, परमेश्वर गिते, आशा व गटप्रवर्तक युनियनचे किरण सावजी, रमेश साखरे, खंडेराव सांगळे, जालिंदर गिरी, चंद्रशेखर सरकटे, सुवर्णा रेवले, अश्विनी खेत्रे आदींची निवड केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.