आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा संरक्षण कवच:सहा लाख हेक्टरवरील पिकांना यंदा मिळाले विमा संरक्षण कवच

अमाेल मुळे | बीड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ६ लाख २७ हजार हेक्टरवरील पिकाला विम्याचे संरक्षण मिळाले आहे. १६ लाख ४८ हजार ८०१ शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा भरला. गतवर्षी पावसाने पिकांचे नुकसान झाल्यानंतर विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला होता. त्यामुळे यंदा पुन्हा शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याकडे कल वाढला. गतवर्षीच्या तुलनेत ४ लाख ८० हजार शेतकऱ्यांत वाढ झाली आहे.

नैसर्गिक आपत्ती, पेरणी किंवा काढणीपूर्व नुकसान, पिकांच्या काढणीनंतर झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होते. यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली होती. यात शेतकरी, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या सहभागातून शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण देण्यात येते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच पीक विमा योजनेला चांगला प्रतिसाद दिला. बीड हा दुष्काळी जिल्हा असल्याने व जिल्ह्यात खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस न होता परतीचा पाऊस अधिक होत असल्याने दरवर्षी पेरणीनंतर पीक उगवून न येणे किंवा परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होते. त्यामुळे पीक विमा संरक्षित करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. १ ऑगस्ट ही पीक विमा भरण्याची यंदा अंतिम मुदत होती.

सन २०२० मध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. मात्र, कंपनीच्या नुकसानीनंतर ७२ तासांत तक्रार देण्याचा नियमाचा फटका बसला. नुकसानग्रस्त ४ लाखांपैकी केवळ २० हजार शेतकऱ्यांनाच विमा मिळाला होता. त्यानंतर २०२१ मध्ये विमाधारक शेतकऱ्यांची संख्या कमी झाली होती. मात्र, गतवर्षीही पावसाने नुकसान झाले मात्र नियमाप्रमाणे तक्रारी केल्यानंतर शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला हाेता.

दोन्ही शासनाने सम प्रमाणात भरला हप्ता
पीक विम्यात १६ लाख शेतकऱ्यांनी ७४.५७ कोटींचा हिस्सा भरला आहे, तर राज्य शासनाने २१७.८० कोटी आणि केंद्र शासनानेही सम प्रमाणात २१७.८० कोटी असा एकूण ५१०.१७ कोटी रुपयांचा विमा हप्ता कंपनीला भरला आहे. यातून ३ हजार ९८ कोटींची रक्कम संरक्षित केली आहे.

बातम्या आणखी आहेत...